Thursday, November 21, 2019

सिने डान्सर्स असोसिएशनच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सरोज खान नर्तकांच्या मुलींसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून देणार


७० वर्षीय नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना सिने डान्स असोसिएशन(सीडीए) ला फिल्म इंडस्ट्रीची सर्वात मोठी संघटना बनवायची आहे.

सिने डान्सर्स असोसिएशनने भारतातील पहिली महिला नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांना ब्रँडअ‍ॅम्बेसेडर म्हणून म्हणून घोषित करत त्यांचा गौरव केला. यावेळी सिने डान्सर्स अससोसिएशन चे अध्यक्ष निलेश पराडकर,अध्यक्ष झाहीद शेख, सरचिटणीस रवी कनवर, डिस्प्युट अध्यक्ष  अल फहीम सुरांनी (राज) आणि अन्य अससोसिएशन चे मॅनॅगिंग कंमिट्टी चे सदस्य देखील उपस्थित होते.

सिने डान्सर्स असोसिएशनचे अध्यक्ष जाहिद शेख सांगतात की, "सरोज खान यांनी या व्यवसायाला आपल्या आयुष्याची ५०  हून अधिक वर्षे दिली आहेत आणि आता त्यांचा सन्मान करण्याची आणि त्यांना त्यांच्या हक्काचे योग्य असे स्थान देण्याची वेळ आली आहे."

७० वर्षीय नृत्यदिग्दर्शक, सरोज खान यांनी त्यांच्या किशोरवस्थेत या क्षेत्रात पदार्पण केले. सीडीएच्या आजच्या निर्णयाने भारावून जात त्या म्हणतात की, "मी अजूनही एक ग्रुप डान्सर आहे आणि माझ्याकडे अद्याप माझे सीडीए कार्ड आहे. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून मला नावाजले असल्यामुळे, मला (सीडीए) ला फिल्म इंडस्ट्रीची सर्वात मोठी संघटना बनवायची इच्छा आहे. मी १० वर्षाची असताना चित्रपटांमध्ये नृत्याची सुरुवात केली आणि आता पुन्हा एकदा आपल्या घरी परतली आहे. यावेळी मी त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देईन ज्या आमच्या काळात उपलब्ध नव्हत्या.  मी चांगले काम करण्याचे व त्यांना योग्य दिशा देण्याचे वचन देते. आणि चित्रपटसृष्टीत, नर्तकांना आदर प्राप्त होईल ज्याला ते पात्र आहेत.” सरोज खान असेही म्हणालया की, ही संघटना नर्तकांच्या मुलींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करेल.

सरोज खान यांचेही मत आहे की, ज्येष्ठांसाठी निधी गोळा करण्यासाठी स्टेज शो आयोजित केले पाहिजेत, जेणेकरून निवृत्त आयुष्य जगणार्‍या आणि जगण्यासाठी पैशांची गरज असलेल्यांना पेन्शन म्हणून हा पैसा वापरता येईल आणि प्रत्येक नर्तकांच्या रोजच्या उत्पन्नातून १०० रुपये असावेत, नर्तकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेन्शन फंडाची सुरु व्हावा.

या क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छानार्या मुलाआणि मुलींनाही सरोज खान मान्यता देणार आहे. त्या म्हणालया, “जो कोणी भारतीय आणि पाश्चात्त्य दोन्ही प्रकारचे नृत्य करण्यास  सक्षम असेल तो व्यावसायिक नर्तक बनु शकतो आणि त्याचे संघात स्वागत केले जाईल. विशिष्ट नृत्य प्रकार माहित नसल्याबद्दलचे कोणतेही  निमित्त मी सहन करणार नाही. त्याचबरोबर जर त्यांना मदत आणि प्रशिक्षण आवश्यक असेल तर आम्ही त्यांना प्रशिक्षण देखील देऊ. ” वयाच्या ७० व्या वर्षी, सरोज खान आताही युवा विद्यार्थी आणि नवीन प्रतिभावंताना  नृत्य शिकवत आहे, आणि त्यांनी यावेळी ज्येष्ठांना हि एक सल्ला दिला कि, "बसू नका, नृत्य करा आणि तालीम करा आणि स्वत: ला तंदुरुस्त ठेवा; काम तुमच्याकडे नक्की येईल. ”

सिने डान्सर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश पराडकर म्हणाले, “सीडीए एक कमकुवत संघटना बनली आहे. आम्ही एक मजबूत आणि अधिक चांगली संस्था होण्यासाठी हा प्रयत्न आहे. आम्हाला खात्री करुन घ्यायची आहे की देयके त्यांना वेळेवर दिली जातात आणि पात्र रक्कम त्यांना दिली जाते. ज्येष्ठ सदस्यांना आर्थिक मदत मिळते आणि मला सीडीए वाढावा अशी इच्छा आहे आणि आम्ही आवश्यक ते करू व त्यांना पाठिंबा देत राहू.

No comments:

Post a Comment